देशात कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्के

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड १९ चे  ४० हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी २३ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्के आहे. काल ४३ हजारापेक्षा जास्त नवे रूग्ण आढळले, तर ३३८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशभरात ३ लाख ९३ हजारापेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. देशभरात काल कोविड प्रतिबंधक लशींच्या ८६ लाख ५१ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. लसीकरण मोहिमेतंर्गत देशात आतापर्यंत दिलेल्या मात्रांची संख्या ७१ कोटी ६५ लाखाच्या वर गेली आहे.

Popular posts
रमजान महिन्यात नमाजासाठी एकत्र जमण्याची परवानगी देता येणार नाही- उच्च न्यायालय
Image
तलिबान सत्तेत आल्यानंनतर अफगाणिस्तानमध्ये ६४००हून अधिक माध्यम प्रतिनिधींनी गमवली नोकरी
Image
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भावेश शेखावत यांनी २५ मिटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात पटकावलं सुर्वण पदक
Image
भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Image
येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
Image