भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून एअर मार्शल व्ही आर चौधरी नियुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल व्ही आर चौधरी यांची हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सध्याचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया येत्या ३० तारखेला सेवा निवृत्त होत आहेत. चौधरी हे मूळचे नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातल्या हस्तरा या गावचे आहेत.