शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना दिल्या शुभेच्छा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षकांनी देशाची तरुण पिढी घडवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. सध्याच्या कोविड काळात विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास खंडीत होऊ नये यासाठी शिक्षकांनी नवनवीन पर्यायांचा अवलंब केला असं पंतप्रधानांनी म्हंटलं आहे. आजच्या दिनाचे औचित्य साधून पंतप्रधानांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली वाहिली तसंच राष्ट्राच्या उभारणीत त्यांचं योगदानही अधोरेखित केलं.