देशात दैनंदिन नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात दैनंदिन नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली आहे. देशात काल दिवसभरात नवी रुग्णसंख्या 20 हजारपक्षा कमी होती. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 18 हजार 870 नवे कोरोनाबाधित आढळून आले. सध्या बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 82 हजार 520 झाली. ती गेल्या 194 दिवसातली सर्वात कमी संख्या असून एकूण रुग्णसंख्येच्या 84 शतांश टक्के आहे. गेल्या मार्चनंतर प्रथमच एवढी कमी रुग्णसंख्या नोंदली गेली. रुग्ण बरे होण्याचा दर आता 97 पूर्णांक 83 शतांश टक्के झाला असून तो गेल्या मार्च पासूनचा सर्वात जास्त आहे.

काल दिवसभरात देशात 28 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे झाले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 कोटी 29 लाख 86 हजार 180 झाली आहे. नवे रुग्ण आढळण्याचं साप्ताहिक प्रमाण 1 पूर्णांक 82 शतांश टक्के झालंय तर दैनंदिन प्रमाण सव्वा टक्के झालं आहे. आतापर्यंत या आजाराने 4 लाख 47 हजार 751 जणांचा मृत्यू झाला असून त्यातले 378 रुग्ण काल दिवसभरात मरण पावले. देशभरात आतापर्यंत 56 कोटी 74 लाख कोविड चाचण्या झाल्या असून त्यातले 15 लाख 4 हजार नमुने काल तपासण्यात आले.

राज्यात काल कोविड १९ चे ३ हजार २९ रुग्ण बरे होऊन घरी गेले, २ हजार ८४४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ६० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ४४ हजार ६०६ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६३ लाख ६५ हजार २७७ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३८ हजार ९६२ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ३६ हजार ७९४ ॲक्टिव रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक २६ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.