दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह ८ जण दोषमुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह आठ जण दोषमुक्तल्ली इथल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी सत्र न्यायालयानं आज छगन भुजबळ यांच्यासह आठ जणांना दोषमुक्त केलं आहे. आपला न्याय देवतेवर विश्वास आहे, आपण संयमानं सत्र न्यायलयाच्या आदेशाचा स्वीकार करतो, अशा शब्दात अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदनाच्या कथित घोटाळ्या प्रकरणी सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर बातमीदारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटदाराला या प्रकरणी अजून एक फूटाचा एफ एस आय किंवा एक रुपया देखील दिला नसल्यचं स्पष्टिकरण त्यांनी दिलं. या प्रकरणी ८०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप छगन भुजबळ आणि अन्य आठ जणांवर झाला होता. निकाला नंतर आपण शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. सत्र न्यायलयाच्या निकाला विरोधात ज्यांना उच्च न्यायलयात जायचं त्यांनी जरूर जावं, सत्र न्यायलयाचा निकाल मूळ मुद्द्यावरंच असल्याचं ते म्हणाले.

Popular posts
मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती दिलासादायक – कृषिमंत्री दादाजी भुसे
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर
Image
जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती
Image