टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत बॅडमिंटनपटू प्रमोद भगतला सुवर्ण पदक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकिओ पॅरालिंपिक स्पर्धेत बॅडमिंटनपटू भगतन भारताला चौथं सुवर्णपदक मिळवून दिलं. यामुळे भारतानं आतापर्यंत मिळवलेल्या पदकांची संख्या १७ झाली आहे, यात चार सुवर्ण, सात रौप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे. मनोज सरकारनंही आज बॅडमिंटनमधे कांस्य पदक मिळवलं.  

५० मीटर मिश्र पिस्तूल स्पर्धेत मनीष नरवालनं सुवर्ण तर सिंहराज अधाना यानं रौप्य पदक पटकावलं आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे.