मुंबईसह अनेक भागात पावसाचा जोर ओसरला

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मुंबईसह कोकणात आणि पश्चिम महारष्ट्रात अतिवृष्टिचा ईशारा हवामान विभागानं  दिला होता मात्र प्रत्यक्षात काल रात्री पासून पावसाचा जोर काहिसा ओसरला आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसापासून चांगला पाऊस झाल्यानं पाणी साठ्यात लक्षणीय भर पडलीय. आज मध्य वैतरणा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे तानसा धरणाचीही पाणी पातळी वाढली असल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागानं दिली. सध्या सर्व तलावांमध्ये ९७ पूर्णांक ७२ शतांश टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

 उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर काहिसा वाढला आहे.  नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार कालही सुरूच होती. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने गंगापूर धरणातून सकाळी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. विदर्भ मराठवाडा सीमेवरील यवतमाळ जिल्ह्यातल्या उर्ध्व पैनगंगाप्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला आहे. त्यामुळे प्रकल्पावरील इसापुर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. इसापूर धरण जवळपास ९९ टक्के भरलं असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यामुंळे आणि  पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळं प्रकल्पाच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्यात काल सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरु होता.या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

पालघर जिल्ह्यातल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू आहे. धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून कवडास धरण भरून वाहत आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या ९१ लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पात सततच्या पावसानं बर्याणपैकी जलसंचय झाला आहे. मासरूळ आणि मोताळा अंतर्गत पिंपळगांव नाथ हे प्रकल्प काल १०० टक्के भरले. हिंगोली जिल्ह्यात काल दुपारी चारच्या सुमाराला जोरदार पाऊस झाला. अनेक ओढे. नदी नाले ओसंडून वाहू लागले.

हिंगोली तालुक्यात बोंडाळा गावाजवळच्या ओढ्याला पूर आल्यानं पुराचं पाणी गावात शिरलं. दरम्यान नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीमुळं मुखेड तालुक्याला पुराचा फटका बसला आहे. नांदेड शहरातही काल सायंकाळी साडेसात ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडला. नंदुरबार जिल्ह्यात प्रकाशा इथल्या तापी नदीपात्रात दोघे भाऊ अंघोळीला गेले असतांना एक जण वाहून गेला तर दुसर्यााला वाचविण्यात नावाडयांना यश आलं.

Popular posts
नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप  
Image
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
Image
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य सरकारचं आवाहन
Image
महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय
Image
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Image