मुंबईत ४ ऑक्टोबरपासून इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग प्रत्यक्ष सुरु करण्यास परवानगी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत येत्या सोमवारपासून ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु होत आहेत. महानगर पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी शहरातल्या कोविड स्थितीचा आढावा घेऊन या शाळा सुरु करायला परवानगी दिली आहे. शहरातल्या शाळा सुरु होणार असल्या तरी त्यांना राज्य सरकारने घालून दिलेल्या कोरोनाविषयक सूचनांचं पालन करावं लागणार आहे. राज्याच्या ग्रामीण भागातही ५वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग आता भरणार असून शहरी भागात ८ वी ते १२ पर्यंतचे वर्ग भरणार आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या प्रत्यक्ष बैठकाही पुढच्या महिन्यापासून सुरु होणार आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासकीय यंत्रणांना नगरसेवकांच्या प्रत्यक्ष बैठकांची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.