राज्यात अनेक गावापत एक गाव एक गणपती संकल्पना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करताना आपली जबाबदारी ओळखून राज्यात अनेक गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना उचलून धरली आहे. सांगली जिल्ह्यात यंदा २२१ गावांनी ही संकल्पना राबवून पर्यावरण रक्षणाचा तसंच महामारीशी लढा देण्यासाठी समंजस वर्तनाचा संदेश दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी जिलह्यातल्या ४०४ गणेशोत्सव मंडळांची बैठक बोलावून उत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन केल होतं. त्याला आयोजकांनी सराकात्मक प्रतिसाद दिला. ६६ गावांनी यंदा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातही यंदा सलग दुसऱ्या वर्षी एक गाव एक गणपती ठेवण्यात आला आहे.