देशाची आर्थिक उन्नती होण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा महत्त्वपूर्ण ठरतात - नितीन गडकरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची आर्थिक उन्नती होण्यासाठी तसंच महसुली पाया भक्कम होण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा महत्त्वपूर्ण ठरतात, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडियाच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. 

भारतात सर्वसमावेशक आणि एकात्मिक पायाभूत सुविधेचा विकास करण्यासाठी लवकरच १०० लाख कोटी रुपयांची प्रधानमंत्री गतिशक्ति योजना सुरु केली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.