भारतातील शहरी नियोजन क्षमता या विषयावर निती आयोगानं तयार केलेल्या अहवालाचं आज प्रकाशन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील शहरी नियोजन क्षमता या विषयावर निती आयोगानं तयार केलेल्या अहवालाचं आज प्रकाशन करण्यात येणार आहे. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या उपस्थितीत आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या अहवालाचं प्रकाशन होणार आहे.निरोगी शहरांच्या नियोजनातील हस्तक्षेप, बळकट शहरी शासन व्यवस्था, शहरातील जमिनींचा पुरेपूर वापर इत्यादी शहर विकासाच्या विविध पैलूंबाबतच्या शिफारसींचा या अहवालात समावेश आहे. निती आयोगानं ऑक्टोबर 2020 मध्ये स्थापन केलेल्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे.