लोकसभेच्या ३ आणि १४ राज्यांमधल्या विधानसभेच्या ३० जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं आज ३ लोकसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. मध्य प्रदेशातील खांडवा मतदारसंघ, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि  दादरा नगर हवेली मतदारसंघांची पोटनिवडणूक येत्या ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. आयोगानं १४ राज्यांमधल्या ३० विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकाही जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये आसाममधल्या ५, पश्चिम बंगाल मधल्या ४, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी ३, राजस्थान, बिहार आणि कर्नाटकातील प्रत्येकी २ मतदारसंघांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मिझोरम, नागालँड आणि तेलंगणातील प्रत्येकी एका मतदारसंघातही याच दिवशी निवडणूका होत आहेत. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि पुढील महिन्याच्या 8 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 

 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image