संस्कृत सप्ताहानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशवासियांना शुभेच्छा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आजपासून २५ ऑगस्टपर्यंत संस्कृत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. संस्कृत सारख्या प्राचीन भाषेला चालना देण्यासाठी आणि लोकप्रिय बनवण्यासाठी या सप्ताहा अंतर्गत विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्यानिमित्त दिलेल्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या भाषातज्ज्ञांना शुभेच्छा दिल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संस्कृत भाषा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल प्रधानमत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. संस्कृतची लोकप्रियता जगभरात वाढत असून संस्कृत सप्ताहामुळे संस्कृत भाषेचा प्रसार व्हायला मदत होईल, असा विश्वासही  मोदी यांनी व्यक्त केला आहे.