उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रधानमंत्र्यांकडून सुरुवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज उत्तर प्रदेशात उज्वला २ या योजनेचं उद्घाटन झालं. या योजने अंतर्गत, लाभार्थींना पहिला गॅस सिलिंडर आणि एक शेगडी मोफत दिली जाणार आहे. स्थलांतरितांना शिधापत्रिकेशिवाय या योजनेचा लाभ घेता येणार आहे. देशातला महिलावर्ग आजवर मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला. या सुविधांची पूर्तता झाल्यावर राष्ट्राच्या विकासात महिला अधिक सक्षमपणे  योगदान देऊ शकतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.