आयसीसीकडून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर 

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीनं येत्या ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या टि ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक आज जाहीर केलं. संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये या स्पर्धा होणार आहे. यानुसार १७ ऑक्टोबरला पहिल्या फेरीत यजमान ओमान आणि पेपुआ न्यू गयाना यांच्यातल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. या दोन संघांसह पहिल्या फेरीत श्रीलंका, बांग्लादेश, नेदरलँड, आर्यलँड, स्कॉटलँड, नमिबिया.  हे सर्व संघ दोन गटात विभागलेले असतील. यानंतर गटविजेत्याला सूपर ट्वेल फेरीत प्रवेश मिळेल. अबुधाबी इथं २३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यानं सूपर ट्वेल फेरीला सुरु होईल. हे सामनेही दोन गटात होतील, भारताचा समावेश ब गटात असेल. स्पर्धेतला भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत होणार आहे. त्यानंतर १० आणि ११ नोव्हेंबरला स्पर्धेची उपांत्य फेरी, तर १४ नोव्हेंबरला दुबई इथं स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सामना होणार आहे.