राज्यातल्या नागरिकांना मिळाल्या लशीच्या एकूण ५ कोटींहून अधिक मात्रा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल दिवसभरात एकूम ६ लाख ३३ हजार १५३ जणांना कोविड प्रतिबंधक लस दिली गेली. आत्ता पर्यंत राज्यातल्या एकूण ५ कोटी ५५ हजार ४९३ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस दिली असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. यापैकी १ कोटी ३० लाख ७६ हजार ६४ नागरिकांना लसीची दुसरी मात्रा मिळाली असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. देशात दुसरी मात्रा मिळालेल्यांमध्ये राज्य पहिल्या क्रमांकावर असून, १ कोटीपेक्षा जास्त जणांना लसीची दुसरी मात्रा मिळालेलं महाराष्ट्र हे देशातलं आजवरचं एकमेव राज्य आहे.