सीबीएसई इयत्ता १०वीचे निकाल जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई अर्थात केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीचे निकाल आज जाहीर झाले. यंदा ९९ पूर्णांक ४ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्रिवेंद्रम विभागात सर्वाधिक ९९ पूर्णांक ९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर गुवाहाटी विभागात सर्वात कमी ९० पूर्णांक ५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलींचं प्रमाण सर्वाधिक ९९ पूर्णांक २४ टक्के इतकं आहे, तर एकूण ९८ पूर्णांक ८९ टक्के मुलं उत्तीर्ण झआली आहे. याशिवाय १०० टक्के तृतीयपंथी मुलं उत्तीर्ण झाली आहेत.