इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताचं दुसऱ्या डावात आश्वासक उत्तर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत आज चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव २ बाद २१५ धावांवर पुढे सुरु करेल. चेतेश्वर पुजारा ९१ तर विराट कोहली ४५ धावांवर खेळत आहेत. भारत पहिल्या डावातील धावसंख्येनुसार अद्याप १३९ धावांनी मागे आहे. पहिल्या डावात इंग्लंडच्या ४३२ तर भारताच्या ७८ धावा झाल्या होत्या.