पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा

 


पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा पडला आहे. स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहायक कक्षात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांची तपासणी सुरू आहे. एका कंत्राटदाराकडून २ लाख रुपये लाच स्वीकारली म्हणून स्थायी समितीचा लिपिक आणि शिपाई यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. भाजापाची सत्ता असलेल्या महापालिकेत कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार होत असल्याच्या बातम्या वारंवार छापून येतात. त्याच्या आधारावर लाचलुचपत विभागाने आज दुपारी स्थायी समितीची बैठक सुरू झाल्यानंतर छापा टाकला.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image