देशात ३६ हजार ५७१ नवे कोरोनाबाधित रुग्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात ३६ हजार ५७१ नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३६ हजार ५५५ जण कोरोनामुक्त झाले. या काळात कोविड-१९ मुळे ५४० रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली. उपचाराखालील कोरोना रुग्णसंख्येत काल ५२४ नं घट झाली. देशात सध्या ३ लाख ६३ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांचं प्रमाण १ पूर्णांक १३ शतांश टक्के आहे. बरे झालेल्या कोरोना रुग्णांचं प्रमाण ९७ पूर्णांक ५३ शतांश टक्के आहे. देशात कोविड-१९ मुळे आजवर दगावलेल्यांची संख्या ४ लाख ३३ हजारांच्या वर गेली आहे. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये देशात आजवर ५७ कोटी २२ लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देऊन झाल्या आहेत. दिवसभरात काल ५४ लाख ७१ हजारांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image