देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ४५ शतांश टक्क्यांवर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासात ३९ हजार ६९ रुग्ण कोविडमुक्त झाले, तर ४१ हजार १९५ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. या कालावाधीत कोविड-१९ मुळे ४९० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. काल १ हजार ६३६ रुग्णांची नव्यानं भर पडली. सध्या देशात ३ लाख ८७ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. देशात बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण ९७ पूर्णांक ४५ शतांश टक्के आहे. कोविड-१९ मुळे देशात आजवर दगावलेल्यांची संख्या ४ लाख २९ हजारांवर गेली आहे. देशात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या ५२ कोटी ३६ लाखांहून अधिक मात्रा आजवर देऊन झाल्या आहेत. काल ४४ लाख १९ हजारांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या.