राज्यातली झिका विषाणू संसर्गाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे विशेष पथक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली झिका विषाणू संसर्गाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि राज्यातल्या यंत्रणेला मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं एक विशेष पथक पाठवलं आहे. यात सार्वजनिक आरोग्य अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ आणि कीटकशास्त्रातल्या तज्ञांचा समावेश आहे. हे पथक राज्यातल्या आरोग्य विभागासोबत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेईल. झिका विषाणू संसर्गाच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने आखून दिलेला कृती आराखड्याची अंमलबजावणी योग्यरितीने होते आहे की नाही याची तपासणी करुन आवश्यक सुधारणा सुचवणार आहे.