१० तासांपेक्षा अधिक काळ एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसल्यास बँकेला द्यावा लागणार दंड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एटीएम यंत्रांमध्ये दहा तासांपेक्षा अधिक काळ रोख रक्कम उपलब्ध न झाल्यास त्या बँकांना प्रतीतास दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय भारतीय रिझर्व बँकेनं घेतला आहे. एटीएम यंत्रात  कायम रोख रक्कम उपलब्ध राहावी त्याच प्रमाणे वेळेवर यंत्रात रोख रकमेचा भरणा करण्यावर बँकांनी लक्ष द्यावं असंही रिझर्व बँकेनं आपल्या आदेशात म्हटलं आहे. १ ऑक्टोबर पासून बँकांना हा दंड आकारण्यात येणार असून बँकांनी एटीएम मध्ये कायम रोख रक्कम राहिल हे पाहण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारावी त्याचप्रमाणे बँकांनी  एटीएम मध्ये जमा केलेल्या रोख रकमेच्या वेळांचा अहवालही दर महिन्याला सादर करावा, असंही  रिझर्व बँकेनं आपल्या आदेशात म्हटलं आहे.