नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात बुधवारी ४१ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, तर ४२ हजार ९८२ नव्या बाधितांची नोंद झाली. आत्तापर्यंत देशभरातले एकूण ३ कोटी ९ लाख ७४ हजारापेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याबरोबरच देशाचा कोरोना मुक्तीदर ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशभरात ४ लाख ११ हजार ७६ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. देशाचा साप्ताहिक कोरोना पॉजिटिव्हीटी दर सध्या २ पूर्णांक ३७ शतांश टक्के आहे. गेल्या दहा दिवसांपासून दैनंदिन पॉजिटीव्हिटी तीन टक्क्याच्या खाली असून, सध्या तो २ पूर्णांक ५८ शतांश टक्के असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.