पंतप्रधान येत्या 9 ऑगस्ट रोजी पीएम -किसान योजनेचा पुढील हप्ता वितरित करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) या योजनेअंतर्गत  दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील पुढील  हप्त्याचे वितरण करणार आहेत. या योजनेद्वारे 19,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वितरण होणार असून त्याचा  लाभ 9 कोटी 75 लाख लाभार्थी शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. या  कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान  लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून  राष्ट्राला संबोधितही करणार आहेत.

PM-KISAN योजनेबद्दल

पीएम-किसान योजनेअंतर्गत  पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 2000/- रुपये  तीन समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजे एकूण 6000/-रूपये इतका निधी दिला जातो. हा निधी  लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो. या योजनेद्वारे  शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत 1.38 लाख कोटी  इतका सन्मान निधी हस्तांतरित करण्यात आली आहे. केंद्रीय कृषीमंत्रीदेखील  या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image