पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशातील डॉक्टर समुदायाला संबोधित करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारतीय वैद्यकीय संघटनेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात देशातील डॉक्टर समुदायाला संबोधित करणार आहेत. कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या सर्व डॉक्टरांचा आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा देशाला अभिमान आहे, असं मोदी यांनी काल आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. 1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो.