केंद्राकडून राज्यांना आत्तापर्यंत लसीच्या ४५ कोटींहून अधिक मात्रांच वितरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्तापर्यंत केंद्राकडून विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या ४५ कोटी ३७ लाख मात्रांचं वितरण करण्यात आलं असून त्यातील ३ कोटी ९ लाख मात्रा अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी दिली आहे. आगामी काळात लसीच्या आणखी ५९ लाख ३९ हजार मात्रांचा पुरवठा केंद्र सरकारकडून करण्यात येणार असून लसीकरण मोहीमेचं अधिक काटेकोर नियोजन करून त्याला गती देण्यासाठी सरकार ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या प्रयत्नात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.