केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्र्यांनी आपापल्या खात्यांच पदभार स्वीकारला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या आणि बढती मिळालेल्या मंत्र्यांनी आज आपापल्या खात्याचा कार्यभार स्वीकारला. माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून अनुराग ठाकूर यांनी आज पदभार स्विकारला. गेल्या सात वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उल्लेखनीय काम केलं आहे, असं पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी सांगितलं. माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नारायण राणे यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्री पदाचा तर रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारला.