केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयला देणार भेट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयला भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात उमियम इथल्या बहुउद्देशीय संमेलन केंद्र आणि कलादालनाची त्यांच्या हस्ते कोनशिला बसवण्यात येणार आहे. तसंच पूर्व खासी हिल्सच्या माविओंग इथल्या आंतरराज्य बस स्थानकाचं तसंच याच जिल्ह्यातल्या उम्स्वाली इथल्या क्रायोजनिक ऑक्सिजन प्रकल्पाचं आणि बालरुग्ण विभागाचं उद्घाटनही ते करणार आहेत. आज संध्याकाळी शिलाँग इथं ते ईशान्येकडील राज्यांचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांची बैठक घेणार आहेत.