देशांतर्गत विमान उड्डाणांच्या संख्येत वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं देशांतर्गत विमान उड्डाणांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रालयानं विमान कंपन्यांना आता, ५० टक्क्यांऐवजी ६५ टक्के कामकाज करण्याची परवानगी दिली आहे. देशांतर्गत प्रवासासाठी प्रवाशांकडून मागणी वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा आदेश ३१ जुलै किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू  असेल. कोरोनापूर्व काळातल्या विमान उड्डाणांच्या तुलनेत १ जूनपासून ५० टक्केच उड्डाणे होत होती.