पावसाचे पाणी साठविण्यासाठी भूमिगत टाक्या; मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला कामाचा आढावा

  पावसाचे पाणी साठविण्यासाठी भूमिगत टाक्या; मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला कामाचा आढावा

मुंबई: पावसाचे अधिकचे पाणी साठवण्यासाठी परळ येथील झेवियर्स मैदान व प्रमोद महाजन कला पार्क या ठिकाणी तयार होत असलेल्या भूमिगत टाक्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला. ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मुंबईची भौगोलिक स्थिती आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे थोड्या कालावधीत होणारा प्रचंड पाऊस लक्षात घेता सखल भागात पाणी साचून समस्या निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून अधिक पावसाच्या वेळी दोन्ही टाक्यांमध्ये हिंदमाता परिसरात साचणारे पाणी पंपांच्या साहाय्याने आणून साठवले जाणार आहे. यामुळे हिंदमाता परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने निर्माण होणारी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

कलापार्कच्या सुशोभीकरण व विकास कामासंदर्भात आराखड्याचे यावेळी श्री. ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणदेखील करण्यात आले.

यावेळी खासदार अरविंद सावंत, नगरसेवक श्रीमती विशाखा राऊत, प्रीती पाटणकर, उर्मिला पांचाळ, समाधान सरवणकर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त श्री.बल्लमवार, सहायक आयुक्त किरण दिघावकर, शरद उघडे आदी उपस्थित होते.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image