राज्याच्या नवीन सांस्कृतिक धोरणाचं प्रारुप तयार करण्यासाठी तज्ञ समिती गठित करण्याच्या सूचना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या नवीन सांस्कृतिक धोरणाचं प्रारुप तयार करण्यासाठी तज्ञ समिती गठित करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. ते काल मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यातल्या कलाकारांचं सर्वेक्षण संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्याच्या कामाला गती देणं आवश्यक आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची ऑनलाईन बैठक ही काल अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. चित्रनगरीत सध्या अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि चित्रपटांचं चित्रिकरण मोठया प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा, असं देशमुख यांनी या बैठकीत सांगितलं.