प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी केन्द्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा हा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार असेल.मंत्रिमंडळात काही नव्या मंत्र्यांचा समावेश होण्याची, तसंच काही खात्यांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी ६ वाजता शपथविधी होईल. भाजपा आणि मित्र पक्षांच्या अनेक नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळाची सदस्य संख्या ८१ पर्यंत वाढवली जाऊ शकते. सध्या ही संख्या ५२ आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी, कालच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचन्दत गहलोत यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. तर, अनेक राज्यलपालांच्या बदल्या झाल्या आहेत.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्याक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्याशी जवळजवळ महिनाभर सल्ला मसलत केली असून, विविध मंत्रालयाच्या कामाचा आढावाही घेतला आहे.