पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे “साफ-सफाई मदत पथक” आयुक्तांनी चिपळूण आणि महाडला पाठवावे
• महेश आनंदा लोंढे
पिंपरी : कोकणात पावसाने आणि पुराने थैमान घातले आहे. त्यात महाड आणि चिपळूण शहराची अवस्था खूपच बिकट आहे. आपण सर्वजण कोकणचे हापूस आंबे अगदी चवीने आणि आवडीने खातो, कोकणात फिरायला जातो. पण आपला आणि कोकणचा संबंध फक्त मौज - मजा पुरता न ठेवता सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, सुखदुःखात एकमेकांच्या उपयोगी पडले पाहिजे. म्हणूनच, पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष माधव पाटील यांनी आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
पत्रात ते असे म्हणतात की, आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे सुद्धा कुशल कर्मचारी आहेत, साफ-सफाईची सुसज्ज यंत्र-सामुग्री आहे. म्हणून आपल्याच कोकणच्या बंधू- भगिनिंची मदत करण्यासाठी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे “साफ-सफाई मदत पथक” चिपळूण आणि महाड येथे पाठवावे.
नुकतेच मुंबई महानगरपालिकेने कोल्हापूर येथे मदतकार्यासाठी आपले पथक पाठवले आहे. या टीमसोबत आम्हा काही सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांना सहभागी व्हायला आवडेल.
चिपळूण आणि महाड इथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे “साफ-सफाई मदत पथक” पाठवल्याने असे केल्याने सामाजिक सलोखा, एकोपा वाढण्यास नक्की मदत होईल. आपण असे पथक पाठवले तर या निर्णयाचा पिंपरी चिंचवडकरांनासुद्धा नक्की आनंद होईल, ते या निर्णयाचे स्वागतच करतील असे माधव पाटील यांनी या पत्रात म्हंटले आहे. माधव पाटील यांनी इमेल आणि ट्विटच्या माध्यमातून हे पत्र आयुक्तांना पाठवले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये अनेक कोकणवासीय वास्त्यव्यास आहेत. या शहराच्या वाढीसाठी कोकणवासियांनीही आपला खारीचा वाटा उचलला आहे. या पत्रावर आता आयुक्त राजेश पाटील यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा हीच अपेक्षा.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.