प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने विकासकामे पूर्ण करावी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

  कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाअंतर्गत रत्नागिरी येथे  सुरू होणाऱ्या उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करा- उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

मुंबई : श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय साधून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिले.

आराखड्यातील विकासकामांच्या प्रगतीबाबत श्री.सामंत यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्रालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांच्यासह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.सामंत म्हणाले, श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्याला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आराखड्यातील विविध कामे प्रलंबित आहे. विकासकामे तातडीने पूर्ण करावीत. विकासकामांना पूर्णत्वास नेण्याची प्रत्येकाची सांघिक जबाबदारी आहे. जनतेला पायाभूत सुविधा पुरविणे ही नैतिक जबाबदारी ओळखून प्रशासनाने काम करावे. येत्या जानेवारीपर्यंत विकास आराखड्यातील सर्व पायाभूत सुविधांची कामे, शैक्षणिक क्षेत्रातील कामे, पाणीपुरवठा, नळपाणी योजना, रस्ते विकास आणि व्यापारी संकुलाविषयी प्रलंबित कामांची प्रक्रिया राबवून प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही श्री.सामंत यांनी यावेळी दिले.

Popular posts
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल पियुष गोयल यांच्याकडून समाधान व्यक्त
Image
कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image