आर्थिक आणि नियामक धोरणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेतली तूट भरून निघण्यास मदत होईल- आरबीआय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक आणि नियामक धोरणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेतली तूट भरून निघण्यास मदत होईल, असं भारतीय रिझर्व बँकेनं काल सांगितलं. आरबीआयनं काल आर्थिक स्थैर्य अहवाल प्रसिध्द केला. आर्थिक धोरणांना पाठींबा मिळाल्यानं आणि लसीकरणालाही वेग आला असल्यानं जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेला बळ मिळत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.