साहसी पर्यटनविषयक धोरणासंबंधी सूत्रबद्ध धोरण आखण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने साहसी पर्यटनविषयक धोरण जाहीर करायची घोषणा केली आहे. यासंदर्भातलं सूत्रबद्ध धोरण आखण्यासंदर्भातल्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली. पॅराग्लायडींग, ट्रेकींग, वॉटर राफ्टिंग, बायकींग, रॉक क्लायबींग, स्कुबा डायव्हिंग यांसह एकूण २५ प्रकारांचा समावेश या धोरणात असणार आहे. या धोरणात पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल, त्यानुसार धोरणात समावेश केल्या जाणाऱ्या सुरक्षाविषयक नियंमांचे पालन करणे आयोजनकर्त्यांना बंधनकारक असेल असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी राज्य आणि विभागीय स्तरावरच्या समित्या स्थापन केल्या जातील. या समित्यांमध्ये भू, हवाई तसेच जल पर्यटनविषयक तज्ञांचा समावेश असेल असेही ठाकरे यांनी सांगितले