देशात बुधवारी ४४ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल सुमारे ३३ लाख ८१ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ३६ कोटी ४८ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ४४ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ कोटी ९८ लाखाच्या वर गेली आहे. काल ४५ हजार ८९२ नवे रुग्ण आढळले. तर, ८१७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशभरातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ५ हजार २८ झाली आहे. देशात सध्या ४ लाख ६० हजार ७०४ रुग्ण उपचाराधीन आहेत.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image