माजी केंद्रीय मंत्री आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचं निधन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री आणि हिमाचल प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते वीरभद्र सिंग यांचं आज सिमला इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. नऊ वेळा  आमदार,  पाच वेळा खासदार असलेल्या सिंग यांची  हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून प्रदीर्घ सहा वेळा निवड झाली होती. एप्रिल महिन्यात कोरोना संक्रमित झाल्यामुळे त्यांना मोहाली इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. कोरोनातून  बरे झाल्यानंतर काही काळानी  त्यांची तब्येत पुन्हा खालावली आणि पुन्हा उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीरभद्रसिंग यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.