वैद्यकीय सेवा क्षेत्रात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासनाचा कौशल्य विकास महाआरोग्य कार्यक्रम सुरु

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रांमध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा प्रारंभ काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचं महत्व अधोरेखीत झालं आहे. या क्षेत्राला भरीव मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. काळाची गरज ओळखून आपण  हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करत आहोत.  त्यातून हे मनुष्यबळ तयार होण्याबरोबरच राज्यातल्या बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.