देशात गेल्या २ महिन्यातल्या सर्वात कमी रुग्णांची नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असून काल दिवसभरात केवळ १ लाख ४१ हजार ४६० रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या २ महिन्यातील ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. देशात काल २ हजार ६७७ नागरिकांचा मृत्यू झाला तर काल देशभरात १ लाख ८९ हजार ८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं काल एका दिवसात २० लाख ३६ हजार ३११ नमुन्यांची तपासणी केली आहे.