राज्यात एकाच दिवसात ७ लाखाहून अधिक जणांचे लसीकरण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रानं आज कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात नवा उच्चांक गाठला. राज्यात आज एकाच दिवसात ७ लाखाहून अधिक जणांना कोविड१९ प्रतिबंधक लस दिल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ७ लाख २ हजार ४३२ जणांना कोविड१९ प्रतिबंधक लस दिली गेली. या कामगिरीबद्दल राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी लसीकरण मोहीमेत सहभागी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.