पाण्याची बचत करणं गरजेचं - प्रकाश जावडेकर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलसंवर्धनाची नवनवी तंत्र वापरुन तसंच पाणी वापरण्याच्या सवयी बदलून पाण्याची बचत करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.

ऊर्जा आणि साधनसामुग्री संस्था टेरी तर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येच्या निमित्तानं आयोजित जागतिक शाश्वत विकास परिषदेत आज ते बोलत होते. विविध कारणांनी वापरण्यायोग्य पाण्याची उपलब्धता देशात कमी होत आहे.

उपलब्ध पाण्यापैकी ८५ टक्के पाणी शेतीसाठी वापरलं जातं. जलसिंचनाच्या वेगळ्या पद्धती वापरुन जलस्रोतांचं योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे, तसंच घरगुती वापराचंही अधिक चांगलं नियोजन केलं पाहिजे असं ते म्हणाले.