नागरिकांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोरोनायोद्ध्यांना समर्पित : इरफान सय्यद

 

आरोग्यदूत, कामगार, कष्टकरी, वंचितांना एक हात मदतीचा

पिंपरी : यंदाही करोनाचं संकट असल्याने आपण वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी कुणीही येऊ नये. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करू नका, त्याचप्रमाणे जाहीरात फलकही लावू नयेत. त्याऐवजी मतदारसंघात समाजोपयोगी उपक्रम राबवून जनतेला दिलासा द्या, असे आवाहन खेड-भोसरी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा कामगार नेते इरफान सय्यद यांनी कार्यकर्त्यांना केले होते. कार्यकर्त्यांनी देखील इरफान यांच्या आवाहनाला साद देत सेवाकार्याचे आयोजन केले. मतदार संघातील सर्वच शिवसैनिक एकवटल्याने खेड-भोसरी मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले.

कोरोनाच्या काळात कष्टकरी वर्गाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 'मदतीचा एक हात द्या' या आवाहनाला भोसरीकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटना व साद सोशल फाउंडेशनने कष्टकरी बांधकाम कामगारांना अन्नधान्य तथा जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप केले. नाका कामगारांसाठी सुदामा थाळी हा उप्रकम राबविण्यात आला. पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर नाका कामगारांना रेनकोट वाटप करण्यात आले. रूपीनगर-तळवडे परिसरात मराठवाडा युवा मंचाच्या वतीने सुजाता काटे व महिला मंडळ यांच्या वतीने तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. मावळ तालुक्यातील समुद्रा कोविड सेंटर (टाकवे) व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कान्हे वडगाव मावळ येथे स्टीमर (वाफेचे मशीन) वाटप करण्यात आले. देवळे गावातील नैसर्गिक शिक्षण व संशोधन प्रशिक्षण संस्था इथे अनाथ मुलांना अन्नधान्य तथा जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले. जुन्नर आंबेगाव तालुक्यात राजे ग्रुपकडुन पळस्टिका बालकाश्रम, राजाराम पाटील वृद्धाश्रम, अन्नपुर्णा केंद्र राजुरी येथे किराणा वाटप, विठाई साबीर अन्नछत्र लंगर नारायणगाव येथे लाडु वाटप, तर मुस्तफा अन्सारी यांच्याकडुन अन्नदान करण्यात आले. शिवसेना खेड तालुका प्रमुख, श्री.तनुजा ताई घनवट, खेड तालुक्यात युवा नेते इरफान पठाण व दत्ताभाऊ कंद यांनी चांडोली ग्रामीण रुग्णालयात वृक्षारोपण व वाफेच्या मशिनचे वाटप केले. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांना न्यूबलायझेशन मशीनचे वाटप करण्यात आले. तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले श्री.आबा मांढरे, सर्जेराव कचरे, "पुनरुत्थान समरसता गुरुकुलम" क्रांतिवीर चापेकर विद्यालय परिसर, गावडे जलतरण तलाव शेजारी पांढरीचा मळा चिंचवडगाव येथे भटके विमुक्त मुलांना अन्नदान करण्यात आले व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राउत, शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे माजी पुनर्वसन मंत्री तथा आमदार तानाजी सावंत, चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, राज्य लेखा समितीचे मा.अध्यक्ष सचिनजी पतवर्धन, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा महिला संघटीका सुलभाताई उबाळे, माजी गटनेता राहुल कलाटे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन भोसले, मंचर-जुन्नर सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर, माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, शिवसेना ज्येष्ठ नेते गुलाबराव आल्हाट, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, शिवसेना समन्वयक भोसरी विधानसभा परशुराम आल्हाट, शिवसेना महिला संघटिका भोसरी विधानसभा रूपालीताई परशुराम आल्हाट, खेड-भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्व विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला सेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक आदींनी फोनद्वारे संपर्क साधून इरफान यांना शुभेच्छा दिल्या.

कामगार नेते इरफान सय्यद आभार प्रकट करताना म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून आमचे आराध्य तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आघाडी सरकार हे नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने करोनाची लढाई लढत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. मात्र, करोनाचा धोका टळलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करण्याचे आदेश दिले आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती आहे. उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून शासनाच्या मार्गदर्शक नियमांचे पालन करायचे आहे.

''कार्यकर्त्यांना कोरोनाच्या अनुषंगाने सोशल डिस्टेंसिंगचे पालन करून वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. त्यानिमित्त खेड, भोसरी विधानसभा मतदारसंघात व शहरात विविध सामजिक उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले. कोरोना योद्ध्यांचाही गौरव केला. नागरिकांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मी करोनायोद्ध्यांना समर्पित करतो.''