राज्यात कोविड १९ साठीच्या कडक निर्बंधात १५ जूनपर्यंत वाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लागू केलेले निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार आहेत. मात्र रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेनुसार जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करत असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर १० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यापेक्षा कमी भरले असतील तर तिथे सर्व आवश्यक वस्तू आणि सेवांची दुकानं सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील. आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांबाबत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल.

आवश्यक गटातल्या दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील, तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील. अशा भागांत आवश्यक वस्तूंबरोबरच आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील. दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील. कृषिविषयक दुकाने दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील.

येणारा पावसाळा आणि पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकतात किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवायला परवानगी देऊ शकतं. ज्या पालिका किंवा जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यापेक्षा जास्त असेल, आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील, तिथं निर्बंध वाढवले आहेत. अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद राहतील.

कुणालाही जिल्ह्याच्या आत बाहेर करायला परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातला मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल. या सर्वांसाठी २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटची आकडेवारी गृहीत धरली जाईल. १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक समजल्या जातील. तर या पालिका क्षेत्रांव्यतिरिक्त जिल्ह्यातला उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील. याव्यतिरिक्त इतर सर्व जिल्हे आणि पालिकांच्या ठिकाणी ब्रेक दि चेनचे निर्बंध आधीप्रमाणे लागू राहतील.

Popular posts
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image