उसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी तालुकास्तरावर वसतीगृह सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : उसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी तालुकास्तरावर वसतीगृह सुरू करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत भगवानबाबा वसतिगृह योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

ऊसतोड कामगारांची जास्त संख्या असलेले राज्यातले ४१ तालुके निवडून त्या प्रत्येक तालुक्यात १००विद्यार्थी क्षमता असलेले मुला-मुलींसाठी स्वतंत्र असे एकूण ८२ वसतिगृहं उभारण्यात येतील. या ठिकाणी निवास, भोजन आदी सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

योजनेच्या पहिल्या टप्यात बीड जिल्ह्यात परळी, केज, पाटोदा, गेवराई, माजलगाव आणि बीड तर अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी आणि जामखेड , जालना जिल्ह्यात घनसावंगी आणि अंबड या दहा तालुक्यात  मुला-मुलींसाठी २ असे एकूण २० वसतिगृह उभारायला मंजुरी देण्यात आली आहे.