देशभरातल्या विविध राज्यांना द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम भारतीय रेल्वेनं अव्याहतपणे सुरु ठेवलं आहे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या विविध राज्यांना द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन म्हणजेच एलएमओ चा पुरवठा करण्याचं काम भारतीय रेल्वेनं अव्याहतपणे सुरु ठेवलं आहे. आतापर्यंत ३२ हजार मेट्रीक टन एलएमओचा पुरवठा ऑक्सिजन  एक्सप्रेसनं केला आहे. विविध राज्यांना १ हजार ८३४ पेक्षा अधिक टँकर्सचा पुरवठा झाला आहे. रेल्वेमंत्रालयानं ही माहिती दिली आहे.