मराठा आरक्षणासाठी १६ जून रोजी पहिला मोर्चा काढणार - संभाजी राजे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी येत्या १६ जून रोजी पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आज रायगडावरून केली.

शिवाजी महाराजांचा ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा आज परंपरागत पध्दतीनं आणि मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात साजरा झाला. यावेळी संभाजी राजे आणि त्यांचे पुत्र शहाजी राजे यांनी महाराजांच्या उत्सव मूर्तीवर सुवर्णहोनांनी अभिषेक केला.

शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी संपूर्ण रायगड आणि किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राज्याभिषेक सोहळ्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना संभाजी राजे यांनी मराठा समाजाला गृहित धरू नका,आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे, आता न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image