राजधानी एक्सप्रेसचे इंजिन घसरल्यामुळे विस्कळित झालेली कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राजधानी एक्सप्रेसचे इंजिन घसरल्यामुळे विस्कळित झालेली कोकण रेल्वेची वाहतूक आता पूर्ववत झाली आहे.

रत्नागिरीजवळ उक्षी आणि भोके या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या दरम्यान करबुडे बोगद्यात रेल्वेमार्गावर दरड कोसळल्यामुळे निजामुद्दीन ते मडगाव मार्गावरच्या राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन पहाटे सव्वाचारच्या सुमारास रुळावरून घसरले होते.

या अपघातात कोणीही जखमी झालं नव्हतं. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या चार तासात दरड दूर करून मार्ग सुरळीत केला. सव्वानऊ वाजता राजधानी एक्स्प्रेस तर साडेदहा वाजता इतर सर्व खोळंबलेल्या गाड्या आपापल्या मार्गावर मार्गस्थ झाल्याची माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.