कोरोना परिस्थितीमुळे लादलेले निर्बंध एकदम शिथिल न करण्याचा केंद्र सरकारचा सल्ला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोरोना परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येते आहे. मात्र तरीही निर्बंध एकदम उठवण्याची घाई करू नये, असा सल्ला नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिला आहे. पहिल्या लाटेनंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुसरी लाट आहे. त्यामुळे  निर्बंध हळूहळू उठवले तर कदाचित तिसरी लाट कमी स्वरुपात येईल किंवा येणारच नाही, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.